Trending News : जगभरात ख्रिसमसची (Christmas) तयारी सुरु आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर ख्रिसमस सण साजरा केला जातो. पण गुजरातमध्ये (Gujrat) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातमधल्या वडोदरा (Gujarat Vadodara) इथं सांता क्लॉजच्या (Santa Claus) वेशात आलेल्या एका तरुणावर काही तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. वडोदरातल्या मकरपूरा भागातल्या अवधूत सोसायटीत ख्रिसमस साजरा केला जाणार होता. पण त्याआधीच सांता क्लॉजच्या वेशातील एक तरुण आणि एका महिलेसह चार जण अवधूत सोसायटीत पोहोचले.
सांता क्लॉजवर हल्ला
यावेळी सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या त्या तरुणावर आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर लोकांवर तिथल्या काही तरुणांनी हल्ला केला. यात सांता क्लॉज बनलेल्या तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा आमचा एरिया असल्याचं सांगत तरुणांनी सांता क्लॉजवर हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर तरुणांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शुभेच्छा देण्यासाठी आला होता सांता क्लॉज
मिळालेल्या माहितीनुसार सांताक्लॉजच्या वेशात पोहोचलेल्या तरुणाचं नाव शशिकांत डाभी असं आहे. मकरपूर परिसरातील अवधूत सोसायटीत रहाणाऱ्या एका ख्रिश्चन कुटुंबाला नाताळच्या शुभेच्या देण्यासाठी शशिकांत तिथे आला होता. शशिकांतसोबत आणखी चार जण होते. त्या ख्रिश्चन कुटुंबासह शशिकांत डाभी आणि त्याच्याबरोबर आलेल्या व्यक्ती ख्रिसमस साजरा करत होते. त्याचवेळी काही तरुण अचानक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी कार्यक्रम थांबला.
हे ही वाचा : Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन
घरात घुसलेल्या तरुणांनी शशिकांत डाभीला आधी धमकावलं नंतर त्याच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर शशिकांत डाभीला सांता क्लॉजचे कपडेही उतरवायला सांगितला. तसंच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतरांनाही हल्लेखोर तरुणांनी धमकावलं. आमच्या एरियात असा कार्यक्रम तुम्ही करु शकत नाही असं सांगत त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी वडोदरातल्या मकरपूरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.