गुजरातमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. 

Updated: Jul 15, 2017, 10:02 PM IST
गुजरातमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. 

पाऊस आणि पूरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. पूराचं पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे हाल होतायेत. 

एनडीआरएफच्या 11 टीम घटनास्थळी लोकांना सुरक्षित हलविण्याचं काम करताहेत. आतापर्यंत 1500 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी पोहचवलंय. तर पूरामुळे सात जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडीत झालाय.