गुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात

गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय. 

Updated: Oct 5, 2017, 04:42 PM IST
गुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात  title=

गांधीनगर : गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय. 

व्हॅट कमी केल्यानंतर गुजरातमध्ये पेट्रोल - डिझेल स्वस्त होणार आहे. अद्याप हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. 

इंधनांवर लागणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याची मागणी केंद्रानं राज्य सरकारकडे केली होती. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या आवाहनानंतर भाजपप्रणित राज्यांत पेट्रोल - डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्यात. त्यामुळे गुजरातप्रमाणेच इतर भाजपप्रणित राज्यांतही पेट्रोल - डिझेल स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 

३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल - डिझेलमधून बेसिक एक्साईज ड्युटी कमी केली होती. यानंतर पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत २ रुपयांनी घट झाली होती. या किंमती ४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून लागू करण्यात झाल्या होत्या.