गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीचं (Gujarat Assembly Election 2022) बिगुल वाजलंय. गुजरातमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होणार असल्याचं निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मतदान 1 आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला आहे. आपप्रमुख अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (gujarat assembly election 2022 isudan gadhavi is candidate of chief minister for aam aadmi party announced arvind kejriwal)
इसुदान गढवी (Isudan Gadhavi) हे गुजरातमध्ये आपच्या मुख्यमंत्रिपदाचे (Aap Gujrat Cm Face) उमेदवार असतील अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. गढवी हे सध्या आपमध्ये राष्ट्रीय सहसचिव या पदावर आहेत. राजकारणात येण्याआधी ते पत्रकार होते.
पत्रकारितेत असतान गढवी यांना आमच्या पक्षात या अशी ऑफर भाजप, काँग्रेस आणि आपकडून होती. गुजरात आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आहेत. तसेच तत्कालिन गुजरात प्रभारी गुलाब सिंह यादव होते. काही महिन्यांपूर्वी इटालिया यादव आणि गढवी यांच्यात भेट झाली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. विषय केजरीवाल यांच्यापर्यंत गेला. अखेर गढवी यांचं आपमध्ये जाण्याचं ठरलं. त्यानुसार गढवी यांनी 14 जुलै 2021 मध्ये पत्रकारितेत साइन आऊट करत राजकारणातील इनिंगला सुरुवात केली. गढवी अशाप्रकारे पत्रकारितेतून राजकारणाकडे वळले.