Gudi Padwa 2024: हिंदु धर्मामध्य गुढीपाडवा सणाला विशेष महत्व आहे. नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपसून होते. हा दिवस महाराष्ट्रातील लोक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. याबद्दल माहिती घेऊया.
पोईला बोईशाख हा सण बंगला नोबोबोरशी नावानेदेखील ओळखला जातो. हा बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस असतो, जो नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 किंवा 15 एप्रिलला हा सण साजरा केला जातो.
गोवा आणि केरळमध्ये कोकणी समुदाय गुढीपाडवा सवस्तर पाडवा म्हणून साजरा करतात.
काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.
मणिपूरमध्य या दिवसाला साजिबू नीगमा पानबा म्हटले जाते.
चैत्र नवरात्रीची सुरुवात या दिवसाने होते.
या दिवशी महाराष्ट्रात हिंदु धर्मीय घरासमोर गुढी उभारतात.बांबुवर चांदी-तांब्याचा उलटा कलश ठेवला जातो. सुंदर साडीने गुढीचे टोक सजवले जाते. लिंबाची पाने, आंब्याचा टाळा आणि लाल फुलांनी गुढीची शोभा वाढवली जाते. गुढी उंच ठिकाणी ठेवली जाते. ज्यामुळे ती सर्वदूर दिसते. अनेक लोक गुढी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवतात किंवा खिडकीवर लावतात.
कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडव्याचा सण युगादी नावाने ओळखला जातो. तर केरळच्या समृद्ध भूमीत पिक उगवल्याचा आनंद या दिवशी साजरा करत विशु उत्सव साजरा केला जातो. अगदी दिवाळीप्रमाणे हा सण साजरा होतो. आरशासमोर पिकं, भाज्या आणि हंगामी फुले ठेवून दिवसाची सुरुवात होते. या व्यवस्थेला विशु कनी म्हटलं जातं.
बैसाखी संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला साजरा केला जातो. 5 नद्यांची भूमी असलेल्या पंजाबमध्ये बैसाखखीला विशेष स्थान आहे. वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी शिख बांधव हा दिवस साजरा करतात.
बिहारमध्ये हा सण मैथिली नव वर्षे म्हणून साजरा केला जातो. बिहार, झारखंड एवढंच नव्हे तर नेपाळच्या मैथिलीमध्ये जुड शीतल सण साजरा केला जातो. मैथिली नव वर्ष सर्वसाधारणपणे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 14 एप्रिलला साजरे केले जाते.
ब्रम्ह देवाने या ब्रम्हांडाची रचना केली होती. त्यामुळे गुढीला ब्रम्हध्वज मानले जाते, असे म्हणतात.
प्रभू राम 14 वर्षेाचा वनवास संपवून अयोध्येत परतला तो दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो.
गुढी उभारल्याने घरी समृद्धी नांदते असे सांगितले जाते.
रग्बी पिक कापल्यानंतर पुन्हा परेल्याच्या आनंदात शेतकरी हे पर्व साजरे करतात.