महिलेला अमानुष मारहाण, 'या' राजकीय नेत्यावर मोठा आरोप : CCTV Footage

महिलेला स्टीकने बेदम मारहाण

Updated: Dec 1, 2021, 07:41 AM IST
महिलेला अमानुष मारहाण, 'या' राजकीय नेत्यावर मोठा आरोप : CCTV Footage  title=

मुंबई : एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा वाद नेमका कशावरून झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र महिलेला भररस्त्यात काही पुरूष आणि महिलेने मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी अमानुष होती की, महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहणंही कठीण झालं होतं. 

राजधानी दिल्लीतील शालिमार बाग परिसरात एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. हा हल्ला १९ नोव्हेंबरला झाला होता. मारहाणीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडितेने आम आदमी पार्टीच्या (आप) स्थानिक आमदारावर तिला मारहाण करण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप केला आहे.

फुटेजमधून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये काही पुरुष आणि महिला एका महिलेला काठीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

तुम्ही देखील पाहा व्हिडीओ

या महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली की ती आपल्या पायावर उभी राहू शकत नव्हती. मंगळवारी व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलमधून बाहेर येताच तिने सर्वप्रथम सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढले. जेणेकरून दोषींना कायदेशीर मदतीद्वारे शिक्षा करता येईल.

आमदारावर गंभीर आरोप 

महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून पीडितेने आम आदमी पार्टीच्या (आप) शालीमार बागमधील आमदार वंदना कुमारी यांच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत आमदाराचा उल्लेख असला तरी त्याच्यावर एफआयआर दाखल झालेला नाही.

फरार आरोपींचा शोध सुरू 

याप्रकरणी आम्ही दोन महिला आरोपींना अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.