Lover Threat To Groom To Be: सगळी तयारी झाली, लग्नाला (Wedding) अवघे काही दिवस शिल्लक इसताना अचानक नवरदेवाने (Groom) लग्न मोडले. मुलीच्या वडिलांनी कारण विचारले सत्य समजताच त्यांच्याही पायाखालची जमिन हादरली. हतबल झालेल्या बापाने लगेचच पोलिस स्थानकात (Police Station) धाव घेतली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हापुडा जिल्ह्यातील ही घटना आहे.
एका माथेफिरु तरणाने नवऱ्याला अशी धमकी दिली की तो आता लग्न करायला घाबरत आहे. धमकी मिळाल्यानंतर नवऱ्या मुलाने मुलीच्या वडिलांना फोन करुन लग्न मोडल्याचे म्हटलं आहे. वडिलांनी कारण विचारताच त्याला धमकी मिळाल्याचे सांगितले आहे. त्यानंतर लगेचच वधूच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
खेमचंद्र यांच्या मुलीचे टेलरिंगचे काम करणाऱ्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर विवाहाचे विधी दोन्ही कुटुंबीयांकडून सुरू झाले होते. सगळ्यात पहिला विधी नवरीच्या ओटी भरणाचा करण्यात आला होता. त्यानंतर लग्नाची तारीख २७ जून २०२३ काढण्यात आली होती. दोन्हीकडील कुटुंबीयांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. लग्नाला एकच महिना उरला असल्याने वर आणि वधू पक्षाने कंबर कसली होती.
बहिणीच्या प्रेम-प्रकरणाबाबत कळलं, भावाने दिली अशी शिक्षा की वाचून अंगाचा थरकाप उडेल
लग्नाच्या तयारीत व्यस्त असतानाच नवरदेवाला एका माथेफिरुचा फोन आला होता. त्यात त्यांनी जर तु वरात घेऊन गेला तर मांडवातून तुझा मृतदेहच बाहेर पडेल, अशी धमकी त्याला देण्यात आली. त्यानंतर घाबरलेल्या नवरदेवाने लगेचच लग्न मोडले आहे.
मुलीच्या वडिलांनी लगेचच पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार, लगेचच पोलिसांनी कारवाई करत आरोपींची ओळख पटवली आहे. माथेफिरु तरुणाचे नाव अमित असे आहे. तर, त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन जणांची ओळखही पटली आहे. सेहवाग असं एकाचं नाव आहे तर दुसऱ्या एका आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही.
रागात 12 वर्षांच्या मुलाने घर सोडले, दोन दिवसांनी जंगलात सापडला मृतदेह, गळ्यात दोरी; गूढ कायम
पोलिसांनी लगेचच तीन आरोपींचा शोध सुरू केला आहे. अमितचा पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊ. त्याचबरोबर वर आणि वधू पक्षाला लग्नाच्या दिवशी सुरक्षा पुरवण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.