अरे बापरे! पान की किडा? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा नक्की काय?

डोकं लावा आणि तुम्हीच सांगा हे नक्की काय आहे?

Updated: Aug 26, 2021, 09:52 PM IST
अरे बापरे! पान की किडा? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा नक्की काय? title=

नवी दिल्ली: सोशल मीडियावर फोटोमधून प्राणी शोधण्याचं चॅलेंज तुम्ही घेतलं असेल. पण आता एक वेगळंच चॅलेंजर आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल. कारण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हाच प्रश्न पडेल हे नेमकं काय आहे पान की किडा. सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदी पाहिल्यानंतर एक क्षण तुम्हाला हे किड्याने खाल्लेलं पान वाटेल आणि तुम्ही तिथेच फसाल.

सायंन्स बाय गफ द्वारे हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सर्वात पहिल्यांदा एसो वर्ल्ड नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर हा व्हिडीओ पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. जगातील सर्वात मोठ्या पानांचा किडा असं कॅप्शन त्यावेळी देण्यात आलं होतं. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की किती अजब प्रकारचा हा किडा आहे. नुसतं पाहिलं तर एक क्षण अळीने किंवा किड्याने कुरतडलेली पानं वाटतात पण नीट पाहिलं की दिसतं हा एकप्रकारचा किडा आहे. या किड्याच्या त्वचेचा रंग हिरव्या रंगाचा आहे. तर पायाकडे त्याचा रंग मातकट दिसत आहे. म्हणजे हा किडा जर पाय दुमडून बसला तर एक क्षण आपल्याला हे एखाद्या झाडाचं पानच वाटू शकतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Science by Guff (@science)

या किड्याची लांबी साधारण 10 सेंटीमीटर एवढी आहे. या कड्यांमध्ये फक्त मादा अशा असतात. हा व्हिडीओ पाहून युझर्सही हैराण झाले आहेत. झाडांच्या पानांमध्ये हा किडा ओळखणं अशक्य होऊ शकतं असं काही युझर्सनी म्हटलं आहे.