Government School: मुख्याध्यापक आहे की वैरी! शाळेतील मुलांकडून करून घेतली 'ही' कामं

र काही शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या वागणुकीबद्दल ऐकून आपल्याला धक्का (Shocking) बसतो. असाच एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाचा राग अनावर ( Anger) होईल. 

Updated: Sep 9, 2022, 01:31 PM IST
Government School: मुख्याध्यापक आहे की वैरी! शाळेतील मुलांकडून करून घेतली 'ही' कामं  title=
government primary school principal forced to children clean toilet video viral on social media

Students Cleaning Toilet viral video: आई-वडीलांनानंतर गुरु हे आपलं जीवनाचे शिक्षक असतात. शाळा (School) ही आपल्याला घडवणारं मंदिर असतं. भारतात आज गावोगावी अनेक शाळा आहेत जिथे मुलं शिक्षण घेतं आहेत. हायफाय शाळांपासून सरकारी शाळेंचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर (social media)  पाहिले आहेत. काही सरकारी शाळेंची अवस्था पाहून तिथल्या राजकारणी लोकांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तर काही शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या वागणुकीबद्दल ऐकून आपल्याला धक्का (Shocking) बसतो. असाच एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाचा राग अनावर ( Anger) होईल. 

मुख्याध्यापक की वैरी?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जिल्हा प्राथमिक शाळेतील (District Primary School) मुलांकडून बाथरूमची स्वच्छ (Clean bathroom) करुन घेण्यात येतं आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता ही मुलं (children) टॉयलेट साफ करत आहेत आणि एक माणूस त्यांना शिव्या घालत आहे. नीट साफ नाही केल्यास बाथरुममध्ये बंद करण्याची धमकी तो या विद्यार्थ्यांना देत आहे. (government primary school principal forced to children clean toilet video viral on social media)

कुठला आहे हा व्हिडीओ?

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलियामधील (Ballia) हा संतापजनक व्हिडीओ आहे. मूलभूत शिक्षण अधिकारी मणिराम सिंह (Maniram Singh) यांनी सांगितले की, ''बुधवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ सोहवन परिसरातील पिपरा कला प्राथमिक शाळेचा (Pipra Kala Primary School) आहे.व्हिडीओमधील व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.''

पायाभूत शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेकडून उत्तर मागितले 

मूलभूत शिक्षण अधिकारी मणिराम सिंह यांनी सांगितले की, ''सोहवन गटशिक्षणाधिकाऱ्याकडून अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.''