नवी दिल्ली : डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय.
त्यामुळेच, आता डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याची तयारी सरकारला पुन्हा करावी लागतेय. पण, यासाठी सरकारनं आखलेल्या प्लानमुळे सामान्यांना मात्र मोठा झटका बसू शकतो.
यासाठी, आयटी मंत्रालयानं अर्थ मंत्रालयाकडे काही महत्त्वाच्या शिफारसी सोपवल्यात. सूत्रांच्या माहितीनुसार, या शिफारसींप्रमाणे आता कॅश ट्रान्झॅक्शन जास्त महाग होणार आहे तर डिजिटल ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांना अधिक सुविधा मिळतील.
- कॅश काढण्याची प्रक्रिया कठिण केली जावी
- एटीएम फ्री ट्रान्झॅक्शन कमी केलं जावं
- जो जितका टॅक्स देतो तितकीच कॅश मिळावी
- जास्त कॅश ट्रान्झॅक्शनवर दंड लावण्यात यावा
- डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढवण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना इन्सेन्टिव्ह दिलं जावं
- सरकारी ट्रान्झॅक्शनसाठी डिजिटल पेमेंटला प्रमोट केलं जावं
- अर्थव्यवस्थेला फॉर्मल बनवण्यात यावं