सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय स्टेट बँकेत हजारो पदांसाठी भरती, असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023: ज्या तरुणांना बँकेते नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने काही पदांसाठीच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 12, 2023, 11:42 AM IST
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय स्टेट बँकेत हजारो पदांसाठी भरती, असा करा अर्ज?  title=
SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023:  बँकेत नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? बँकीग क्षेत्रात करियर करायचे आहे. नोकरी मिळवण्यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न पडत असतात. गेल्या काही वर्षात बँकांनी आपली कामगिरी टिकवून आणि आपला व्यवसाय वाढवला. त्यामुळे या बँकामध्ये सध्या नोकऱ्यांच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी विविध बँकेच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर होत असते. याचपार्श्वभूमीवर यंदाही ज्यांना बँकेत (Bank Job) नोकरी करणाऱ्यांची इच्छा असेल अशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारी बॅंक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1031 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? शैक्षणिक पात्रता किती? जाणून घ्या सविस्तर माहिती...

बँकेत नोकरी करुन करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 1031 पदांसाठी भरती करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंच रजिस्ट्रेशन करु शकतात. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल रोजी जाहिरात जारी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी भरती करणार आहे. SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेचे कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

वाचा : ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; जाणून घ्या आजचे दर  

इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. दरम्यान ही भरती स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कराराच्या आधारावर केली जाणार आहे. 

कोणत्या पदासाठी जागा

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर पदासाठी 821 रिक्त जागा आहेत. तर चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक पदासाठी 172 आणि सहाय्यक अधिकारी पदासाठी 38 जागा रिक्त आहेत.

किती पगार मिळेल

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर - 36000 रु

चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक - 41000 रु

सपोर्ट ऑफिसर - 41000 रु

निवड कशी होईल

SBI मधील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाईल.