सरकारला तुमच्या आजुबाजूची माहिती द्या आणि 3 लाख रुपये कमवा... कसं ते जाणून घ्या

या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता आणि सरकारची अशी कोणती योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात हे जाणून घ्या.

Updated: Aug 19, 2021, 11:34 AM IST
सरकारला तुमच्या आजुबाजूची माहिती द्या आणि 3 लाख रुपये कमवा... कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. सरकारच्या या उपक्रमात तुम्हीही योगदान देऊ शकता आणि यासाठी सरकार तुम्हाला पैसेही देणार आहे. अशा परिस्थितीत, सरकारच्या या योजनेत योगदान देऊन, तुम्ही केवळ सरकारसाठीच नव्हे तर समाजासाठीही खूप उपयुक्त काम करू शकता, ज्यासाठी तुम्हाला सरकारकडून बक्षीस मिळेल.

अशा परिस्थितीत तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता आणि सरकारची अशी कोणती योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात हे जाणून घ्या.

राजस्थान सरकारने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत भ्रूण लिंग चाचणीत सहभागी डॉक्टर आणि इतरांना आळा घालण्यासाठी माहिती देणारी योजना सुरू केली होती. अलीकडे, आता या योजनेअंतर्गत दिलेल्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम अडीच लाखांवरून आता तीन लाखांपर्यंत करण्यात आली आहे.  या योजनेत सरकारला सहकार्य करणाऱ्या लोकांना तीन लाख रुपये दिले जातील.

काय करायचे आहे?

जन्मापूर्वी लहान मुलांचे लिंग शोधणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती देणारी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये, जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकरणाची माहिती आली, जिथे डॉक्टर हे बेकायदेशीर काम करत आहेत किंवा कोणतेही पालक देखील हे करत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल सरकारला कळवू शकता. जर तुमची माहिती बरोबर आढळली तर तुम्हाला सरकारकडून तीन लाख रुपये दिले जातील.

तक्रार कुठे करू शकतो?

आपल्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास आपण 104/108 किंवा टोल फ्री क्रमांकावर आणि 9799997795 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करू शकता.