नवी दिल्ली : जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डाने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गुवाहाटीमध्ये जीएसटी काँउसिलची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. कॅशचा वापर कमी होण्यासाठी आणि ई व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारद्वारे डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे पेमेंट करण्यावर सवलत दिली जावू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली अशा प्रकारे तयार केली जात आहे की नंतर लोकांना हॉटेलमध्ये पेमेंट करतांना, वस्तूच्या खरेदीनंतर पेमेंट करतांना डिजिटल पेमेंटवर तुम्हाला कर सवलत मिळेल. जीएसटी अंतर्गत कर आकारणीसाठी चार स्लॅब आहेत. 5%, 12%, 18% आणि 28% आहे.
नोटबंदीनंतर कॅशलेस इकॉनॉमीला मोठं महत्त्व दिलं गेलं होतं. पेट्रोलपंप वरून कार्ड पेमेंट केल्यावर कॅश बॅक ऑफर दिले जात आहे. जीएसटीच्या सुरुवातीला करविषयक तपासणीत मदत अपेक्षित होती. पण परिणाम हवे तसे नाही मिळाले. कारण रिटेलर्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर कार्ड्स स्वीकारताना अडचणी दाखवतात आणि कॅशचा वापर अधिक करतात.