'स्मार्ट सिटी'साठी नव्या ३० शहरांची निवड... अमरावती, पिंपरी चिंचवडचाही समावेश

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचाही समावेश आहे. 

Updated: Jun 23, 2017, 05:14 PM IST
'स्मार्ट सिटी'साठी नव्या ३० शहरांची निवड... अमरावती, पिंपरी चिंचवडचाही समावेश title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचाही समावेश आहे. 

नव्या ३० शहरांच्या यादीत केरळचं तिरुअनंतपुरम, छत्तीसगडचं नवं रायपूर आणि गुजरातचं राजकोट या शहरांचीही नावांचा समावेश आहे. या नव्या घोषणेनंतर केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेतील निवड झालेल्या शहरांची संख्या ९० वर पोहचलीय. 

स्मार्ट सिटीकरता यादीत ४० शहरांचे स्थान रिकामे होते... परंतु, व्यावहारिकता आणि कार्याच्या सुनिश्चित योजनेकरता केवळ ३० शहरांची निवड करण्यात आलीय, अशी माहिती यावेळी शहरी विकास मंत्री एम. वेंकैय्या नायडूंनी दिलीय. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ५७,३९३ करोड रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे.