Google चा मोठा निर्णय, प्ले स्टोरमधून काढून टाकले Matrimony.com सह 10 भारतीय ऍप्स

Google Play Store Remove 10 Apps: गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 10 ऍप्स. कारण अतिशय महत्त्वाचं. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 2, 2024, 03:40 PM IST
Google चा मोठा निर्णय, प्ले स्टोरमधून काढून टाकले Matrimony.com सह 10 भारतीय ऍप्स title=

Google Play Store Remove 10 Apps:गुगलने ऍप्सविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. प्ले स्टोअरवरून 10 ऍप्स काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. या 10 ऍप्समध्ये भारतीय ऍप्सचा समावेश त्यांच्यावर कडक कारवाई करत कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी गुगलकडून वेगवेगळी पावले उचलली जातात. पण यावेळी प्रकरण वेगळे आहे. गुगलने भारतातील 10 कंपन्यांचे ऍप्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. यात काही लोकप्रिय मॅट्रिमोनी ॲप्स देखील आहेत. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सेवा शुल्क न भरण्याबाबत एवढा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळेच आता टेक कंपनीने हे ऍप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे शुल्क गुगलने लादू नये, अशी स्टार्टअपची इच्छा होती. गुगलची रक्कम न भरल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते. स्टार्टअप्सना ऍपमधील पेमेंट थांबवायचे होते. मात्र गुगलने आता याला हिरवा सिग्नल दिला आहे. अशा परिस्थितीत, स्टार्टअप्सना शुल्क भरावे लागेल किंवा त्यांचे ऍप काढून टाकले जात आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. यावर न्यायालयाने स्टार्टअपला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Matrimony.com डेटिंग ॲप्स भारत मॅट्रिमोनी, ख्रिश्चन मॅट्रिमोनी, मुस्लिम मॅट्रिमोनी आणि जोडी यासारखे ऍप्स शुक्रवारी हटवण्यात आले आहे. कंपनीच्या संस्थापकाने हा भारतीय इंटरनेटसाठी काळा दिवस घोषित केला आहे. कंपन्यांच्या संस्थापकांनी यावर चिंता व्यक्त करत गुगलकडून आमचे ॲप्स एकामागून एक हटवले जात असल्याचे सांगितले.

काय आहे प्रकरण?

Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज आमच्याकडे गुगल प्ले वापरणारे 200,000 हून अधिक भारतीय डेवलपर्स आहेत जे आमच्या धोरणांचे पालन करतात. जे आम्हाला आमचं गुगल प्ले सुरक्षित व्यासपीठ असल्याची खात्री करण्यात मदत करतात. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून 10 कंपन्यांनी ज्यामध्ये नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांनी गुगल प्ले स्टोअरचे मूल्य भरले नव्हते.  मात्र या डेवलपर्सने इतर ऍप स्टोरच्या सर्व नियमांचे पालन करुन पेमेंटही केले होते. याचा कालावधी 3 वर्षांचा आहे. महत्त्वाचं म्हणजे सुप्रिम कोर्टाकडून आदेश आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे?