खूशखबर : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण

६ फेब्रुवारीनंतर पेट्रोलच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated: Feb 9, 2018, 05:09 PM IST
खूशखबर : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीत कमी व्हायला लागला आहे. ६ फेब्रुवारीनंतर पेट्रोलच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे महागाईप्रश्नी धारेवर धरले जाणाऱ्या भाजपा सरकारसाठीही ही दिलासादायक बाब आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीना वेगाने ब्रेक लागलाय.. सलग पाचव्या दिवशी कच्च्या तेलाच्या किंमती घसरलेल्या दिसल्या. विशेषतज्ञांच्यामते याची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरल येऊ शकते.

महागाईवरही लगाम 

हे सुरु राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींवर ब्रेक लागू शकतो. त्यामूळे महागाईवरही लगाम लागू शकतो. पेट्रोलच्या वाढत्या किमंतीचा परिणाम अन्नधान्य, भाजीपाल्यावर होत असतो.

पेट्रोल कितीने कमी ?

ब्रेंट क्रूड २६ डिसेंबरनंतर आतापर्यंत १० टक्क्यांनी कमी झालायं. ६ फेब्रुवारी ला मुंबईत १ लीटर पेट्रोल ८१.२४ रुपयांनी मिळत होते. शुक्रवारी यासाठी ८१.२१ रुपये द्यायला लागत आहे.