स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

स्टेट बँकेची ग्राहकांसाठी खूशखबर...

Updated: May 30, 2018, 08:23 PM IST
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी title=

मुंबई : जर तुमचं अकाऊंट देखील स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआयच्या नव्या निर्णयाचा फायदा बँकेच्या अनेक कोटी ग्राहकांना होणार आहे, एसबीआयने फिक्सड डिपॉजिटवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी फिक्सड डिपॉजिट केल्यास त्यावर अधिक व्याज मिळणार आहे. 28 मे 2018 पासून हे लागू होणार आहे. बँकेकडून 0.5 बेसिस प्वाइंट ते 25 बेसिस प्वाइंट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या जमा राशीवर वेगवेगळं व्याज मिळणार आहे.

सगळ्यात कमी व्याज 5.75 टक्के 

जर तुम्ही फिक्सड डिपॉजिट करण्यासाठी विचार करत असाल तर तुम्हाला व्याजदरांची माहिती घेणे आधी गरजेचे आहे. एसबीआयमध्ये सगळयात कमी कालावधी 7 दिवसांपासून ते 45 दिवस असणार आहे. या दरम्यान तुम्हाला 5.75 टक्के व्याज मिळेल. 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंत एफडी केल्यास 6.75 टक्के व्याज मिळेल.

एसबीआई, sbi, sbi fixed deposit, sbi term deposit, sbi term deposit rate, sbi interest rate

सर्वाधिक फायदा कुठे

जर तुम्ही एक ते दोन वर्षासाठी एफडी करता तर तुम्हाला 6.65 टक्के व्याज मिळेल. याआधी 6.40 टक्के व्याज दिलं जात होतं. दोन आणि तीन वर्षासाठी एफडी केल्यास 6.65 टक्के व्याज मिळेल. याआधी 6.60 टक्के व्याज दर मिळत होता.

सीनियर सिटीजनला आता 2 ते 3 वर्षासाठी एफडी केल्यास 7.15 टक्के व्याज मिळेल. 3 ते 5 वर्षासाठी एफडी आणि 5 ते 10 वर्षासाठी एफडीवर व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी एप्रिलमध्ये एचडीएफसी बँकेने एफडीमध्ये वाढ केली होती. एका वर्षापेक्षा जास्त एफडी केल्यास एचडीएफसी 7.35 टक्के व्याजदर देते.