Arunachal Pradesh NCP Ajit Pawar group : लोकसभा निवडणूक 2024 साठी अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलची आकडेवारी पाहता तिसऱ्यांदा NDA सत्तेवर विराजमान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहिला मिळणार आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीला 22-26 तर महाविकास आघाडीला 23-25 जागा मिळणार असं भाकीत या एक्झिट पोलमधून करण्यात आलंय. तरदुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी पिछाडीवर असल्याच सांगण्यात आलंय.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच अजित पवार गटाला मात्र गूड न्यूज मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आज सकाळपासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये मतमोजणी सुरु आहे.
अरुणाचल प्रदेशच्या 60 आणि सिक्कीमच्या 32 विधानसभा जागांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने 29 जागांवर तर विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटीक पक्ष 1 जागेवरच आघाडीवर असल्याच पाहिली मिळत आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली सध्या सत्तेत असून त्यांची थेट स्पर्धा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटसोबत दिसून येत आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वीच 10 जागा बिनविरोध जिंकल्या असून 29 जागांवर ते आघाडीवर पाहिला मिळत आहेत. नॅशनल पीपल्स पार्टी 8 जागांवर तर अरुणाचल पीपल्स पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहेत.
अजित पवारांच्या गटाला लोकसभा निवडणुकीपूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक उमेदवाराचा विजय झाला आहे. तर 2 उमेदवार हे आघाडीवर आहेत.