AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, संध्या. 5 वाजता फक्त झी २४तासवर...

AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच AI एक्झिट पोल आज झी २४तासवर संध्याकाळी 5 वाजता पाहता येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 2, 2024, 04:38 PM IST
AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, संध्या. 5 वाजता फक्त झी २४तासवर... title=
AI Exit Poll Lok Sabha Election 2024 on Zee 24 Tass

AI Exit Poll Lok Sabha Election 2024 on Zee 24 Tass : लोकसभा निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. त्याआधी झी 24 तास देशातील सर्वात मोठा एआय एक्झिट पोल दाखवणारेत. लोकसभेच्या निकालाआधी तब्बल 10 कोटी लोकांची मतं असलेला देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच सर्व्हे आपण पाहू शकणार आहात. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून एआय एक्झिट पोलचे आकडे पाहता येणारेय. त्यामुळे देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? सर्वात वेगवान आणि अचूक एक्झिट पोलचे आकडे पाहण्यासाठी पाहा झी 24 तास आज संध्याकाळी 5 वाजता. 

NDA तिसऱ्यांदा सत्तेत येणार?

शनिवारी 1 जून 2024 ला आलेल्या अनेक संस्थांच्या एक्झिट पोलनुसार NDA तिसऱ्यांदा सत्तेत येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला. इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सनुसार एनडीएला 371 तर इंडिया आघाडीला 154 जागा आणि इथर पक्षांना 30 च्या आसपास जागा मिळतील असं भाकीत करण्यात आलं. 

महाराष्ट्रातील चित्र काय असेल?

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त लोकसभा जागा असलेला महाराष्ट्र एक्झिट पोलचे अंदाजही वर्तविण्यात आल आहे. त्यानुसार महाराष्ट्रात रिपब्लिक मॅट्रीजच्या सर्व्हेच्या आधारे ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला 7 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.

हेसुद्धा वाचा - लोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज! एक जागा निश्चित जिंकली तर दोन जागांवर...

आता देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच AI एक्झिट पोल भारत आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकी निकालाचं काय अंदाज देतो हे पाहावं लागणार आहे. त्यासाठी विसरून नका संध्याकाळी 5 वाजता झी24 तासवर पाहा देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल शनिवारी दाखवला. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवला. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)