Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ की घट? पाहा 10 ग्रॅमचा भाव किती?

तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार (Gold investment plan) करत असाल, तर तुमच्यासाठी 'सुवर्ण'संधी आहे. 

Updated: Feb 10, 2022, 08:02 PM IST
Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ की घट? पाहा 10 ग्रॅमचा भाव किती?  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : सध्या लग्नसराईची काळ सुरु आहे. अनेक जण सोनं खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. तसेच काही जण हे सोन्यात गुंतवणूक करतात. तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार (Gold investment plan) करत असाल, तर तुमच्यासाठी 'सुवर्ण'संधी आहे. बॅंक बाजार डॉट कॉमनुसार आज गुरुवारी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. (gold silver today 10 february 2022 rate know 10 grams 22 and 24 carret gold rate in bhopal) 

बँक बाजार डॉट कॉमनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रमचा दर हा 46 हजार 620 इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर हा 48 हजार 950 रुपये आहे.  
 
बुधवारी 9 फेब्रुवारीला 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 46 हजार 470 रुपये इतका होता. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 48 हजार 790 रुपये इतका होता. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. वरील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर हे मध्य प्रदेशातील आहेत.