सोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी; आज इतक्या रुपयांनी महागले, 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

Gold and Silver Prices Today in Maharashtra:  सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे  

मानसी क्षीरसागर | Updated: May 16, 2024, 11:55 AM IST
सोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी; आज इतक्या रुपयांनी महागले, 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा title=
Gold silver price today in maharashtra16 may 2024 gold rate hike

Gold and Silver Prices Today in Maharashtra: आठवड्याचा चौथ्या दिवशीही सराफा बाजारात सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. आज गुरुवारी सोन्याला झळाळी मिळाली आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 700 रुपयांनी वाढले आहेत.  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 74,020 हजारांवर गेला आहे. तर चांदीचा भाव 87,700 रुपयांवर ट्रेड करत आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहक चिंतेत आहेत. 

आज बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. सध्या व्यापाऱ्यांची नजर अमेरिकी सेंट्रल बँकेवर आहे. काही दिवसांनंतर जून पॉलिसीमध्ये US FED व्याजदरांबाबत म्हणणे मांडणार आहेत. सध्या या काळात व्यापाऱ्यांसाठी महगाईचा दर जून पॉलिसीमध्ये फेडरेशन हेच सगळ्यात मोठं चिंतेचे कारण आहे. याचाच परिणाम बुलियनसह अन्य बाजारांवरदेखील होणार आहे. 

सोन्याचा आजचा भाव काय? 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर आज सोन्याचा दर 73,122 रुपये दहा ग्रॅमसाठी आहे. तर, एमसीएक्सवर चांदी 87,090 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. सराफा बाजारात मात्र, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 74,020 रुपये आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 67,850 रुपये इतका आहे. 

सोन्याचे दर कसे असतील?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67,850 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   74,020  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 510 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6,785 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,402 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,551  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   54,280 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   59,216 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44,408  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  67,850 रुपये 
24 कॅरेट- 74,020  रुपये
18 कॅरेट- 55, 510  रुपये

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x