मुंबई : Gold Silver Price Today : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 1.3 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 4 महिन्यांच्या निच्चांक दाखवला आहे. सोने 600 रुपयांनी घसरलं असून 46029 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदी 1.6 टक्क्यांनी घसरलं आहे म्हणजे 1400 रुपयांनी घसरलं आहे. आताचा दर 63983 रुपये प्रति किलो झाला आहे.
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्यात 2000 रुपयांची आणि चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 4.4 टक्क्यांनी घसरलं आहे. ट्रेडिंग सत्रात सोन्याने 1684.37 डॉलरला स्पर्श केल्यानंतर स्पॉट सोने 2.3 टक्क्यांनी घसरून 1,722.06 डॉलर प्रति औंस झाले आहे. याशिवाय चांदी 2.6 टक्क्यांनी घसरून 23.70 डॉलरवर आली आहे. (Sovereign Gold Bond : स्वस्त सोनं खरेदीची सुवर्णसंधी; असं खरेदी करा सोनं)
9 ऑगस्ट रोजी उघडून ही संधी 13 ऑगस्ट रोजी बंद होईल. तसेच 17 ऑगस्ट 2021 रोजी ते तुम्हाला मिळेल. सबस्क्रिप्शन कालावधीदरम्यान बॉण्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम असेल, असे निवेदनात म्हटले आहे. सॉवरेन गोल्ड बाँड सरकारच्या वतीने RBI (RBI) जाहीर केलेत.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बॉण्डसाठी ऑनलाईन अर्ज केले, तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच अशा गुंतवणूकदारांसाठी एक ग्रॅम सोन्याच्या बॉण्डची किंमत 4,740 रुपये असेल. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जाऊ शकतात. ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत विकले जात नाहीत.