Gold-Silver चे काय आहेत आजचे दर ? जाणून घ्या स्वस्त की महाग

भारतीय सराफा बाजारात (Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होत आहे

Updated: Aug 25, 2022, 10:22 AM IST
Gold-Silver चे काय आहेत आजचे दर ? जाणून घ्या स्वस्त की महाग   title=

Gold-silver Price Today : भारतीय सराफा बाजारात (Indian Sarafa Market) गेला काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होत आहे. गुरुवारी भारतीय सराफा बाजारने सोन्या-चांदीचे नवीन दर जाहीर केले आहे.

999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमती 50,861 रुपये आहे. इतर शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ही बदल झाला आहे. तर एक किलो चांदीची किंमत 61,074 रुपये आहे. सध्या सोन्याचा भाव 51,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 53,000 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. एवढेच नाही तर सोने 4500 रुपयांनी तर चांदी 24,700 रुपयांनी स्वस्त होत आहे.

सोने 4500 आणि चांदी 24700 पर्यंत स्वस्त होत आहे

सोने सध्या 4570 रुपये प्रति 10 ग्रॅम त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 24756 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

मिस्ड कॉल देऊन सोन्याची किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.