Gold Silver Price : मुंबईत सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price : काही दिवसांवर गुढी पाढवा येऊन ठेपलाय आणि सोन्या चांदीच्या दरात मोठे चढउतार होताना दिसत आहेत. त्यामुळे काही जण गुंतवणूक म्हणून तर काही जण आवड म्हणून सोने चांदी खरेदी करण्यासाठी घाई करत आहेत.

Updated: Mar 10, 2023, 09:51 AM IST
Gold Silver Price : मुंबईत सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचा भाव title=
(फोटो सौजन्य - PTI)

Today Gold Silver Price 10th March 2023 : गेल्या काही वर्षांपासून सर्व सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे (Gold Silver Price) महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही सोने चांदी खरेदीच्या विचारात असाल तर तुम्हाला त्यात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. कारण सोन्या चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज (शुक्रवार) रुपये 50,900 असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 51,00 रुपये प्रति तोळा होती. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55, 530 रुपये आहे. तर गुरुवारी हा दर 55,630 रुपये इतका होता.

महाराष्ट्रात सोन्याच्या दराची स्थिती काय?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोन्याच्या दरात केवळ शंभर रुपयांनी घट झाल्याची माहिती  गुड रिटर्न्स  या वेबसाईटने दिली आहे. गुरुवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,630 रुपये होती. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम आजचा दर हा 55, 530 रुपये आहे. पुण्यातही 22 कॅरेट सोन्याचा दर  50,900 रुपये आहे. तर पुण्यात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55, 530 आहे. अमरावती, लातूर, कोल्हापूर, सोलापूर औरंगाबाद, अमरावती, नागपूरमध्ये दर हे वरीलप्रमाणेच आहेत. तर नाशिक, वसई-विरार आणि भिवंडीमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,930 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 55,560 रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार गुरुवारी एक किलो चांदी 65,550 रुपयेन विकली जात होती. तर शुक्रवारी हा दर 65,450 रुपये प्रति किलोने विकली जाईल. म्हणजेच एकूणच चांदीच्या दरात घट झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा आणि चांदीचा भाव

दिल्ली 
22ct सोने : रु. 51050, 24ct सोने : रु. 55680, चांदीची किंमत: रु. 65450

मुंबई 
22ct सोने : रु. 50900, 24ct सोने : रु. 55530, चांदीची किंमत : रु. 65450

कोलकाता 
22ct सोने : रु. 50900, 24ct सोने : रु. 55530, चांदीची किंमत : रु. 65450

चेन्नई 
22ct सोने : रु. 51550, 24ct सोने : रु. 56250, चांदीची किंमत: रु. 67400

हैदराबाद 
22ct सोने : रु. 50900, 24ct सोने : रु. 55530, चांदीची किंमत : रु. 67400

बंगळुरु 
22ct सोने : रु. 50950, 24ct सोने : रु. 55580, चांदीची किंमत: रु. 67400

अहमदाबाद (अहमदाबाद सोन्याची किंमत)
22ct सोने : रु. 50950, 24ct सोने : रु. 55580, चांदीची किंमत: रु. 65450

सूरत (सूरत सोन्याचा भाव)
22ct सोने : रु. 50950, 24ct सोने : रु. 55580, चांदीची किंमत: रु. 65450