मुंबई : टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली अभिनेत्री संजीदा शेख या दिवसांत 'हीरामंडी'मधील तिच्या भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे. हिरामंडीमध्ये संजीदाने मल्लिकाजान ही भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारलं. मात्र नुकतीच अभिनेत्रीने घटस्फोटोवर खुलेपणाने भाष्य केलं आहे. सोबतच अभिनेत्रीने असंही सांगितलं आहे की घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीला खूप वाईट वाईट बोलायचे.
कथेची माझी बाजू फक्त मलाच माहीत आहे
संजीदाने झूमला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने आपलं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना संजीदा म्हणाली- 'माझ्या बाजूची गोष्ट फक्त आणि फक्त मला माहिती आहे. माझ्या परिवाराने मला नक्कीत इतकं स्वातंत्र्य दिलं की मी यावर बोलू शकेन. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, मी प्रत्येकवेळी उठून बाहेर जाऊन माझी बाजू मांडत बसू किंवा मला काय वाटतंय हे सांगत बसू. गहे करताना मला खूप गर्व आहे. यामुळे असं केल्याने माझी प्रतिष्ठा आणि पावित्र्य टिकून आहे. मी अशी नाहीये की, कोणी जो केवळ महिलांचं समर्थन करेल आणि पुरुषांना शिव्या देईल.
मला माझ्या निर्णयावर गर्व आहे.
संजीदाने पुढे म्हटलं, मला माहिती होतं की, लोकं आधी कच्च्या पक्क्या गोष्टीवर दोन दिवस बोलतील आणि मग विसरतीलही. मी माझ्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी आधी सुधारल्या आणि मग मी हा निर्णय घेतला. मला माझ्या निर्णयावर गर्व आहे. माझ्या मुलीलाही माझ्यावर गर्व आहे आणि हा सगळ्यात मोठा आशिर्वाद आहे माझ्यासाठी.
घटस्फोटानंतर लोकं खूप वाईट बोलायचे
संजीदाने सांगितलं की आमिर अलीसोबत घटस्फोट झाला होता. लोकं तिच्याबद्दल खूप वाईट वाईट बोलायचे. अभिनेत्रीने याविषयी बोलताना सांगितलं, 'आता लोक मला अभिनेत्री म्हणून गंभीरपणे घेऊ लागले आहेत. आता जेव्हा मी सोशल मीडियावर वाचते तेव्हा लोकं माझ्या कामाबद्दल लिहितात. पण एक काळ असा होता की, लोक माझ्याबद्दल वाईट लिहायचे. माझ्या कामाबद्दल बोलायला हरकत नाही. कारण मी एक अभिनेत्री म्हणून माझ्यातला चूका सुधारेन.
संजीदा शेख आणि आमिर अली 'क्या दिल में है' या शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. २००७ साली या मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर २०१९ साली सरोगसीद्वारे संजीदा एका मुलीचे पालक झाले. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि २०२१ साली या जोडीचा घटस्फोट झाला.