Gold Rate Today : सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Updated: Mar 30, 2022, 04:19 PM IST
Gold Rate Today : सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर title=

Gold Price Today :  बुधवारी सकाळी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. IBJA च्या वेबसाईटनुसार, 30 मार्च रोजी सकाळी सोन्याच्या दरात (Gold Price Today) 75 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 51,422 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. चांदीचे दरात देखील 130 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे आज चांदी 67,063 रुपये प्रति किलो झाली आहे.

दिल्लीत मंगळवारी सोन्याचा भाव 437 रुपयांनी कमी झाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 75.80 रुपयांवर पोहोचला आहे.

22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 47,103 रुपये आहे. 18 कॅरेटची किंमत 38,567 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 कॅरेट सोन्याचा दर 30082 रुपये होता.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

22 कॅरेटचे दागिने असतील तर त्यामध्ये 916 लिहिलेले असेल.
21 कॅरेटच्या दागिन्यांवर 875 लिहिलेले असते.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिलेले असते.
14 कॅरेटचे दागिने असतील तर त्यात 585 लिहिलेले असते.