मुंबई: सोन्या चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. बुधवारी 22 ऑगस्टला चांदीमध्ये घसरण तर सोन्यामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. जरी सोन्यात तेजी असली तरीसुद्धा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोनं स्वस्त मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. वायदा बाजारात 10 ग्रॅम सोन्यासाठी 46,633 रुपये मोजावे लागणार आहेत.
24 कॅरेट सोन्यासाठी 46 हजार 360 रुपये मोजावे लागणार आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 45 हजार 360 रुपये मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेट सोन्यासाठी 35 हजार 263 तर 14 कॅरेट सोन्यासाठी 27505 रुपये मोजावे लागणार आहेत.
22 ते 13 सप्टेंबर कसे आहेत 22 कॅरेट सोन्याचे दर
22 सप्टेंबर 2021- 22 कॅरेट सोन्याचे दर 45,360 ( 30 )
21 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 45,330 ( 200 )
20 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 45,130 ( -260 )
19 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 45,390 ( 0 )
18 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 45,390 ( 0 )
17 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 45,390 ( -390 )
16 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 45,780 ( -550 )
15 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 46,330 ( 330 )
14 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 46,000 ( -10 )
13 सप्टेंबर 2021 22 कॅरेट सोन्याचे दर 46,010 ( -60 )
22 ते 13 सप्टेंबर कसे आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर
22 सप्टेंबर 2021- 24 कॅरेट सोन्याचे दर 46,360 ( 30 )
21 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,330 ( 200 )
20 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,130 ( -260 )
19 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,390 ( 0 )
18 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,390 ( 0 )
17 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,390 ( -390 )
16 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,780 ( -550 )
15 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 47,330 ( 330 )
14 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 47,000 ( -10 )
13 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 47,010 ( -60 )
मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर 45,340 तर 24 कॅरेटचे दर 46,340 हजार रुपये आहेत. 14 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने आता नागरिकांचा पुन्हा एकदा सोनं खरेदीसाठीचा उत्साह वाढला आहे. कोरोनामुळे सोन्याचे दर गेल्यावर्षी वाढले होते. त्यामुळे लोकांची सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे आता दिवळीपर्यंत पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अशी जाणून घ्या सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.