Gold Price Today: मागील आठवड्यात वधारलेले सोन्याचे भाव गेले दोन दिवस चांगलेच घसरले आहेत. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हाला देखील सोनं खरेदी करायचे आहे तर हिच उत्तम संधी आहे. सराफा बाजार आणि वायदे बाजार दोन्हीकडे सोन्याचे दर घसरले आहेत. भारतीय वायदे बाजारात सोनं निच्चांकी पातळीवर घसरले आहे. तर, चांदीदेखील सातत्याने घसरत असल्याचे चिन्हे आहेत. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 69,270 रुपये इतकी आहे. तर, चांदी 165 रुपयांच्या तेजीने 79,788 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे. काल चांदीचा व्यवहार 79,623 रुपयांवर स्थिरावला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकेची मागणी आणि कमी व्याजदर ही सोन्याच्या स्वस्ताईसाठी चांगले संकेत ठरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 440 रुपयांनी घसरले आहेत. तर, 22कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 63,500 रुपये इतके आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र आता सोन्याचे दर घसरले पुन्हा एकदा सराफा बाजारातही आनंद पसरला आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 63,500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 69, 270 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 51,960 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 350 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 6, 927 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 196रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 50, 800 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 55, 416रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 41, 568रुपये
22 कॅरेट-63,500 रुपये
24 कॅरेट-69, 270 रुपये
18 कॅरेट-51,960 रुपये