Gold Rate TOday : सोन्याचे दर इतक्या रूपयांनी वधारले

लग्न सराई आणि सण जवळ आल्यामुळे सोने या मौल्यवान धातूची मागणी वाढली आहे. 

Updated: Mar 15, 2021, 12:18 PM IST
Gold Rate TOday : सोन्याचे दर इतक्या रूपयांनी वधारले title=

नवी दिल्ली : सध्या लग्न सराई आणि सण जवळ आल्यामुळे सोने या मौल्यवान धातूची मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र आता सोन्याचे दर काही प्रमाणात वधारले आहेत. आज 24 कॅरेट 10 ग्राम  सोन्याची किंमत 44 हजार 880 रूपयांवर पोहोचली आहे. गूड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार गेल्या व्यापारी सत्रात 22 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी अनुक्रमे 43 हाजार 870 आणि 44 हजार 860 रूपये मोजावे लागत होते.

जाणून घ्या आजचे दर 

शहर              22 कॅरेट                24 कॅरेट
मुंबई             43 हजार 880       46 हजार 315
पुणे               43 हजार 880       44 हजार 880
दिल्ली            44 हजार 170      48 हजार 180

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरांत सतत चढ-उतार होत आहे. कोरोना काळात जवळपास 60 हजार रूपायांच्या घरात पोहोचले होते. पण अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट सादर केल्यानंतर सोन्याचे दर कमी झाले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.  मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात येत आहे.