Gold-Silver Price | सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दरात

gold silver rate |  सोमवारी सोन्या-चांदीने कमोडिटी मार्केटमध्ये मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. 

Updated: Apr 25, 2022, 11:00 AM IST
Gold-Silver Price | सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दरात title=

मुंबई : सोमवारी सोन्या-चांदीने कमोडिटी मार्केटमध्ये मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. MCX वर, सोन्याचा भाव 229 रुपयांनी (-0.44%) घसरून 52032 रुपये प्रति तोळेवर उघडला. त्याचवेळी चांदीच्या दरात 808.00 रुपयांची मोठी घसरण दिसून आली. MCX वर चांदीची किंमत 65738 रुपये प्रति किलो आहे.

Gold-Silver Price Today : सोमवारी सोन्या-चांदीने कमोडिटी मार्केटमध्ये मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू केले. MCX वर, सोन्याचा भाव 229 रुपयांनी (-0.44%) घसरून 52032 रुपयांवर उघडला. त्याचवेळी चांदीच्या दरात 808.00 रुपयांची मोठी घसरण दिसून आली. MCX वर चांदीची किंमत 65738 रुपये आहे. 

मुंबईतील दर

मुंबईतील 24 कॅरट सोन्याचे दर आज 54700 रुपये प्रति तोळे इतके आहे तर, चांदीचे दर 69400  रुपये प्रति किलो इतके आहे.  

शुक्रवारचे दर

याआधी शुक्रवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. एमसीएक्समध्ये जूनमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 187 रुपयांनी वाढून 52,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सराफा बाजारातही सोने महाग झाले. मात्र, चांदीमध्ये घसरण दिसून आली.

अशी आजची किंमत जाणून 

घरबसल्या सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करा. काही वेळाने तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. यामध्ये तुम्ही सोने चांदीच्या अद्यावत दर तपासू शकता.