Gold Price Today 21st June 2024 : आज वटपौर्णिमेचा (Vat Purnima 2024) सण असल्याने सुवाहिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते आणि सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पूजा करते. मग जर तुम्ही वटपौर्णिमाच्या मुहूर्तावर बायकोला खूष करण्यासाठी दागिने खरेदीचा (gold price today) विचार करत असाल तर तुमच्या शहरातील आजचे सोने आणि चांदीचे दर (silver rates ) जाणून घ्या.
शुक्रवारी मार्केट उघडताच सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहिला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीने भाव खाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या वायदामध्ये तेजी पाहायला मिळतेय.
वट पौर्णिमा सोन्याचे आजचे दर !
शुक्रवारी मार्केट उघडताच Goodreturns वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 810 रुपयांनी वाढल्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 72,440 रुपयांवरुन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी वाढ पाहिला मिळालाय. यामुळे 22 कॅरेट सोन्याचा दर 66,400 रुपयांवरुन 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 610 रुपयांनी वाढ झालीय. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा दर 54,330 रुपयांवरुन 54,940 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका पाहिला मिळतोय.
तुमच्या शहरात सोन्याचा दर पाहा!
आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई - 73,250 रुपये
पुणे - 73,250 रुपये
नागपूर - 73,250 रुपये
कोल्हापूर - 73,250 रुपये
जळगाव - 73,250 रुपये
सांगली - 73,250 रुपये
बारामती - 73,250 रुपये
22 कॅरेट सोन्याचा आजचा दर
मुंबई - 67,150 रुपये
पुणे - 67,150 रुपये
नागपूर - 67,150 रुपये
कोल्हापूर - 67,150 रुपये
जळगाव - 67,150 रुपये
सांगली - 67,150 रुपये
बारामती - 67,150 रुपये
चांदीचा आजचा दर
मुंबई - 94,000 रुपये
पुणे - 94,000 रुपये
नागपूर - 94,000 रुपये
कोल्हापूर - 94,000 रुपये
जळगाव - 94,000 रुपये
सांगली - 94,000 रुपये
बारामती -94,000 रुपये