Gold Price Today | सोनं खरेदीची धमाकेदार संधी चुकवू नका; अशी वेळ पुन्हा येणार नाही

सोनं खरेदीची योग्य वेळ कोणती याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. परंतु सध्या संभ्रमात राहण्याची वेळ नाही. 

Updated: Jul 1, 2021, 03:22 PM IST
Gold Price Today | सोनं खरेदीची धमाकेदार संधी चुकवू नका; अशी वेळ पुन्हा येणार नाही title=
मुंबई : सोनं खरेदीची योग्य वेळ कोणती याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. परंतु सध्या संभ्रमात राहण्याची वेळ नाही.  सोनं सध्या 47 हजार रुपये प्रति तोळे ट्रेड करीत आहे. आजपासून चांदीचा सप्टेंबरचा वायदे बाजार सुरू झाला आहे. 
 
जागतिक तसेच राष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो. तसेच भारतीय बाजारांमधील पुरवठा - मागणीनुसारही सोने चांदीच्या दरांमध्ये बदल होतो. सध्या सोन्याचे दर घसरले आहेत. काही महिन्यात सोन्याचे दर पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. 
 
गुंतवणूकीची संधी
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तरीदेखील ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उंची गाठली होती. त्यावेळी सोने ५५ हजार प्रति तोळेच्या वर गेले होते. त्याप्रमाणात अद्यापही सोन्याच्या किंमतींध्ये मोठी घट असल्याचे दिसून येत आहे.
 
परंतु येत्या दिवसांमद्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीसाठी किंवा रिटेल खरेदीदारांसाठी सोने खरेदीची सध्या चांगली संधी आहे.
 
सोन्याचे आजचे दर
MCX                   47,051 रुपये प्रति तोळे
मुंबई                    47,190 रुपये प्रति तोळे
 
चांदीचे आजचे दर
MCX      69670         प्रति किलो
मुंबई       68,700        प्रति किलो 
 
 
(वर दिलेल्या सोने चांदीचे दर कोणतेही कर वगळून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठांनुसार यात बदल होऊ शकतो)