Gold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये जबरदस्त घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी

सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे दर घसरणीनंतर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत होते. 

Updated: Sep 17, 2021, 02:42 PM IST
Gold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये जबरदस्त घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी title=

मुंबई : सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे दर घसरणीनंतर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत होते. हे दर सोन्याच्या उच्चांकी दरांपेक्षा 10 टक्के स्वस्त आहेत. डॉलर इंडेक्स मजबूत होत असल्याने सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. डॉलर इंडेक्स 3 आठवड्यांच्या उच्चांकीवर आहे. गुरूवारी सोन्यात साधारण 2.7 टक्के घसरण नोंदवण्यात आली. तज्ज्ञांच्या मते सोन्यामध्ये आणखी घसरण होऊ शकते. 

गुरूवारी इंटरनॅशनल गोल्ड स्पॉट आणि फ्युचर 3 टक्क्यांहून जास्त घसरला आहे. युएसमद्ये रिटेल डाटा मजबुत राहिल्याने सोन्यात विक्री दिसून आली तर डॉलर इंडेक्स देखील मजबूत होता. तज्ज्ञांच्या मते टेक्निकल ग्राफ पाहिल्यास MCX वर गोल्ड 46100 रुपयांच्या खाली गेल्यास 45900 ते 45600 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते. 

सध्याच्या सोन्याच्या दरांमध्ये होत असलेली घसरण थांबल्यास तसेच सोन्याच्या किंमती वाढून 46275 रुपयांवर आल्यास सोन्यात 46400 - 46550 रुपयांचे लक्ष ठेवून गुंतवणूक करता येऊ शकते.

मुंबईतील आजच्या सोन्याचा दर
22 कॅरेट 45380 प्रति तोळे
24 कॅरेट 46380 प्रति तोळे 
मुंबईतील चांदीचे दर 61,200 प्रति किलो

---------------------------------------------------

(वरील सोने चांदीचे दर हे सर्व कर वगळता दिले आहेत. स्थानिक बाजारानुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो.)