दिसपूर: आसामच्या गुवाहाटी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी पोलिसांनी तस्करी करण्यात येणारे सोने पकडले. यावेळी चोरट्यांनी सोने लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी रेल्वे पोलीसांचे एक पथक नेहमीप्रमाणे तपासणी करत होते. त्यावेळी फलाट क्रमांक १ वर एक बॅग पोलिसांच्या नजरेस पडली. प्राथमिक तपासणी केल्यानंतर या बॅगेच्या ट्रॉलीला असणारी चाके सोन्याची असल्याचे आढळले. ही चाके सोन्याची आहेत हे ओळखू न येण्यासाठी त्यावर काळा रंगही फासण्यात आला होता.
Assam: Government Railway Police (GRP) recovered three gold pieces, weighing a total of 1200 grams, hidden as wheels of a trolley bag, from the Guwahati Railway station today. pic.twitter.com/iFY2Tnq0e1
— ANI (@ANI) March 28, 2019
पोलिसांच्या अंदाजानुसार चोरट्यांनी सोने लपवून नेण्यासाठी ट्रॉलीच्या चाकांच्या जागी सोन्याची चाके लावली असावीत. या चार चाकांमध्ये जवळपास १२० तोळे असल्याचे समजते. यापूर्वी विमानतळावर सोन्याची तस्करी करण्यासाठी विविध मार्ग वापरण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, ट्रॉलीच्या चाकांमध्ये सोने लपवण्याची शक्कल पाहून अनेकांना धक्का बसला आहे.