रायबरेली, अमेठीनंतर प्रियंका गांधी आज अयोध्या दौऱ्यावर

काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक २०१९ च्या निवडणुकीसोबतच २०१२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचाही संदेश

Updated: Mar 29, 2019, 09:03 AM IST
रायबरेली, अमेठीनंतर प्रियंका गांधी आज अयोध्या दौऱ्यावर  title=

अयोध्या : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करुन त्या अयोध्यात पोहोचतील. दुपारी अडीच वाजता एका शाळेत विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत. तर संध्याकाळी साडे चार वाजता अयोध्यातील हनुमान ललाचं दर्शन घेतील. रोड शो दरम्यान एकूण नऊ ठिकाणी प्रियंका मतदारांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसचे फैजाबादमधील उमेदवार डॉ. निर्मल खत्री यांचा त्या प्रचार करतील. सात तास त्या अयोध्येमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर लखनऊकडे रवाना होणार आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या अयोध्या दौऱ्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

दरम्यान, याआधी प्रियंका गांधी यांनी नुकतीच अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांना भेट दिली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूक २०१९ च्या निवडणुकीसोबतच २०१२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचाही संदेश दिलाय. अमेठीच्या मुसाफिरखानामध्ये झालेल्या मॅराथॉन बैठकीनंतर आणि कार्यक्रमानंतर त्या रात्री जवळपास सव्वा बारा वाजता पक्षाचे स्थानिक नेते फतेह बहादूर यांच्या घरी पोहचल्या होत्या. इथंच त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकांचीही तयारी सुरु करायचा सल्ला दिलाय.

काँग्रेस महासचिन तीन दिवसांच्या उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्या फैजाबादलाही भेट देणार आहेत.