आज 24K सोनं स्वस्त; 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी

Gold Sliver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायाल मिळाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता होती (Gold Price Prediction) परंतु आहे सोनं आणखी स्वस्त झाले आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण आहे त्यातून आज चांदीच्या (Sliver Price) दरात विक्रमी घट झाली आहे.

गायत्री हसबनीस | Updated: May 12, 2023, 11:07 AM IST
आज 24K सोनं स्वस्त; 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी  title=
फाईल फोटो

Gold Sliver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळते आहे. 6 मेनंतर आज सोन्याचे दर (Gold Price Today) हे मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. 6 मे रोजी म्हणजे बरोबर एका आठवड्यापुर्वी सोन्याचे दर हे 760 रूपयांनी घसरले होते. समोर आलेल्या माहितीनुसार आता सोन्याचे दर हे 440 रूपयांनी घसरले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज शुद्ध सोन्याचे दर हे 61,690 रूपये प्रति 10 ग्रॅम आहेत तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 56,550 रूपये प्रति 10 ग्रॅम आहेत. (gold and sliver rates today know the latest price in your city)

किती आहेत सोन्याचे भाव?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. या महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ जास्त प्रमाणात पाहायला मिळाली आहे त्यातून आता सोनं हे अद्याप 60 हजार पारचं आहे. काल-परवापर्यंत सोन्याचे दर हे 62 हजाराच्या पार पोहचले होते. सोन्याचे दर हे असेच वाढत राहिले तर सोनं येत्या काळात 70 हजाराच्या पार जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे सगळीकडूनच चिंता व्यक्त केली गेली होती. परंतु आता जागतिक बाजारातही सोन्याचे दर हे घटल्याचे दिसते आहेत. 

चांदीच्या दरात मोठी घसरण

आज चांदीचे दर हे 75,000 प्रति किलो आहेत. सलग तिसऱ्या दिवशी हे दर घटले आहेत. त्यामुळे चांदीची खरेदी करण्यासाठी आज तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. समोर आलेल्या गुडरिटर्न्सच्या आकाड्यांचा जर का आढावा घेतला तर चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण (Sliver Price Decreases on 3rd Day) झाली आहे. 10 मे रोजी चांदीचे दर हे 100 रूपयांनी घसरले होते तर 11 मे रोजी हेच दर 400 रूपये इतके घसरले होते. आज चांदीचे दर हे 2600 रूपयांनी घसरले आहेत. त्यामुळे आज चांदीच्या दरात ही मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे.  

हेही वाचा - अचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव

सोन्याच्या आणि चांदीच्या दरात काल मोठी वाढ झाली होती तर आज मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असली तरी त्यामुळे ग्राहकांमध्ये संम्रभ कायम आहे. सोन्याचे दर वेगाने वाढत असून ते वेगाने कमीही होत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्यात संम्रभ कायम राहू शकतो. येत्या काळात सोन्याचे दर किती असतील याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण गेल्या दोन महिन्यांपासून पाहायला मिळते आहे.