मुंबई: सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले होते मात्र आता पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहक सोनं खरेदीकडे वळत आहे. बुधवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सराफ बाजारात सोन्याचे दर घसरल्याने पुन्हा एकदा सोनं खरेदीचा उत्साह नागरिकांमध्ये वाढला आहे.
MCX सोन्याचे वायदा बाजारात दर 45 हजार रुपयांपर्यंत तर चांदीचे दर 60 हजार रुपयांपर्यंत आले आहेत. गुड रिटर्न वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, देशातील सोन्याची किंमत जून महिन्यापासून ते आतापर्यंत सोन्यात मोठी घसरण झाली आहे. आताचे दर हे सर्वात कमी असल्याचं सांगितलं जात आहे. सणासुदीला सोन्याचे दर उतरल्याने खरेदीदारांना आनंदाचं वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याचे भाव घसरले आहेत.
जूनमध्ये भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45 हजार 740 होती. तर जुलै महिन्यात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 46,190 रुपये मोजावे लागत होते. ऑगस्टमध्ये ते 45,280 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. सप्टेंबर महिन्या अखेर 22 कॅरेट सोन्यासाठी 45,030 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसू शकते.
14 कॅरेट सोन्याचे दर 27 हजारवर आल्याने तिथेही आनंदाचं वातावरण आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी 24 कॅरेट सोन्याचे दर 56 हजार रुपयांहून अधिक पोहोचले होते. त्यानंतर आता वर्षभराने ही जवळपास 10 हजारहून अधिक रुपये सोन्याचे भाव खाली उतरले आहेत. दुसरीकडे आता शेअर आणि स्टॉक मार्केट प्रमाणे 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढलं आहे.
मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,030 रुपये
दिल्लीमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,340 रुपये
चेन्नईमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 43,540 रुपये
बंगळुरूमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 43,190 रुपये
वर्षाअखेरीस पुन्हा एकदा सोन्याचांदीचे दर वाढच्या शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात आताच गुंतवणूक करावा असा काही तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. सोन्याचे दर आता अजून खाली येणार का याकडे गृहिणी आणि गुंतवणूकदारांचं लक्ष आहे.