लग्नमंडपात उभा असलेल्या दीराला पाहून वहिनीने उचललं मोठं पाऊल

लग्नासाठी तयार असलेल्या दीराला पाहून वहिनीने काही असं केलं एकटक पाहातचं राहिले पाहुणे 

Updated: Sep 29, 2021, 01:12 PM IST
लग्नमंडपात उभा असलेल्या दीराला पाहून वहिनीने उचललं मोठं पाऊल title=

मुंबई : वहिनी आणि दीराचं नातं खास असतं. दीर आणि वहिनी कायम एकमेकांची मस्करी करत असतात. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा दीर नवरदेव होतो, तेव्हा सर्वात जास्त आनंदी दिसत आहे. जेव्हा नवरदेवाची वरात निघते तेव्हा वहिनी डान्स करण्यासाठी सर्वात पुढे असते. आता देखील असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीराचं लग्न असल्याचा आनंद वहिनीच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसत आहे. 

लोकांकडून सध्या सोशल मीडियावर देखील दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीला पसंत केले जात आहे. ज्यामुळे दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंस्टाग्राम (Instagram Reels) वर ऑफिशियल राजपुताना नावाच्या युझरने व्हिडिओ पोस्ट केला आहे. वहिनी आणि दीराच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा पाऊस पडत आहे.