Gold Silver Rate on 30 March 2023 : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अजूनही हे भाव कमी आलेले नाहीत. सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जर तुम्ही सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे दर नक्की तपासून घ्या...
आज (30 मार्च 2023) गुरुवारी सलग दोन दिवस घसरणीनंतर सराफा बाजार सोने-चांदीच्या दरात तेजी आली आहे. BankBazar.Com नुसार, सोन्याचे दर (Gold Price Today) 210 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) 300 रुपयांनी वाढला आहे.
वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी एका SMS वर जाणून पेट्रोल-डिझेलचे नवे दर
आज 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोने 58,410 रुपयांना विकले जाईल. कालच्या (29 मार्च 2023) तुलनेत 210 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या 1, 8 आणि 10 ग्रॅमच्या किंमती अशा काही असतील.
चांदीचा दर कालच्या तुलनेत त्यात 300 रुपयांनी वाढ झाली असून आज 1 किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.