सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

Sunil Desale Updated: Mar 19, 2018, 05:40 PM IST
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट title=
File Photo

नवी दिल्ली : तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.

नागरिकांना दिलासा

सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

किती आहे प्रति तोळा दर

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत सोमवारी ११० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३१,१८० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घसरण 

सोन्याच्या दरात घसरण झाली असतानाता चांदीच्या दरातही १५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदी ३८,९५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

ट्रेडर्सच्या मते, डॉलर मजबूत स्थितीत पोहोचल्यामुळे आणि त्यासोबतच स्थानिक बाजारात मागणीत घट झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. वैश्विक पातळीवर सिंगापूरमध्ये सोने ०.३३ टक्क्यांनी कमी होत १,३०९.३० डॉलर प्रति औंस झाली आहे. तर, चांदीही ०.६१ टक्क्यांनी वाढत १६.२३ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.