Gold Silver Price on 24 April 2023 : लग्नसराई आली की आपल्याला दागिने आणि सोन्याचे दर या गोष्टी डोळ्यासमोर येतात. आता मे महिना सुरू होताच लग्नसराईचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे साहजिकच सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. परिणामी सोने-चांदीची खरेदी वाढते आणि भावदेखील वाढतायेत. जाणून घ्या आज सोने चांदीच्या दरात किती रुपयांनी वाढ झाली आहे.
सराफा बाजारच्या वेबसाइटनुसार आज (24 एप्रिल 2023) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,880 रुपये आहे. तर चांदी 74,890 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 74,890 रुपये प्रति किलो होता. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,880 प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम पुण्यचा दर 54,890 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,880 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,890 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,880 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,202 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 60,220 रुपये आहे.
अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे जगभरात आर्थिक मंदीची भीती अधिक गडद झाली. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. जगभरातील केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू केली आहे. सोन्याच्या किमती वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे अमेरिका आणि इतर देशांमधील बँकिंग संकट, डॉलरमधील कमजोरी, मागणी आणि शेअर बाजारातील अनिश्चितता. या परिस्थितीत सोन्यामधील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या भावालाही आधार मिळाला आहे.
वाचा : Sachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.