मुंबई : सोन्याचे दर गेल्या काही महिन्यांपासून अस्थिर आहेत. बुधवारी पुन्हा सोने-चांदीचे दर वधारले आहेत. एमसीएक्स वर 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 0.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0..3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज, सोन्याचे दर 100 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 47 हजार 981 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत आहेत. याशिवाय चांदीच्या दरात देखील वाढ नोंदवण्यात आली आहे.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 565 रूपये आहेत. तर जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 395 आहे. तर चांदीमध्ये 0.03 टक्क्यांनी वाढवली आहे. आज चांदी 69 हजार 100 रूपये प्रति किलो ट्रेड करत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. 2020च्या सुरूवातीला 10 ग्रॉम सोन्याचे दर 56 हजार 191 रूपयांवर पोहोचले होते. आज सोन्याचे दर वाधारले असले तरी या मौल्यवान धातूला मागणी फार आहे.