मुंबई : मोदी सरकारची महत्वकांशी योजना म्हणजचे प्रधानंत्री आवास योजना होय. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याची योजना आखण्यात आली. 2015 मध्ये जेवढ्या घरांचे लक्ष या योजनेअंतर्गत ठेवण्यात आले होते. त्यापेक्षा 5 कोटी घरांचे लक्ष कमी करण्यात आले होते. तरी देखील अपेक्षित लक्ष साध्य करणे सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. रिसर्च एजंसी ICRA च्या अहवालानुसार, योजनेच्या सध्याच्या गतीचा विचार केल्यास हे मिशन पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 पर्यंत पूर्ण होणार नाही.
मोदी सरकारच्या अनेक महत्वकांशी योजनांचे पूर्ण होण्याचे लक्ष 2022 हे वर्ष आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे असो किंवा सर्वांसाठी घर ही योजना असो. या योजनांचे लक्षपूर्तीचे नियोजित वर्ष 2022 हे आहे. परंतु सर्वांसाठी घर ही योजना 2022 पर्यंत आपले लक्ष साध्य करू शकणार नाही. असे तरी सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे.
सरकारने हाऊसिंग फॉर ऑलचे लक्ष 2015 मध्ये ठरवले होते. की 2022 पर्यंत देशभरात 5 कोटी घरे बनवले जातील. त्या अंतर्गत 2022 पर्यंत देशभरात 5 कोटी घर तयार करण्यात येणार होते. यापैकी ग्रामीण भागात 3 कोटी तर शहरी भागात 2 कोटी घरे बांधण्यात येणार होती.
परंतु नंतर कंन्स्ट्रक्शनची गती कमी झाल्याने ग्रामीण भागात 2 कोटी 14 लाख तर शहरांमध्ये 1 कोटी 12 लाख घरे बनवण्याचे लक्ष ठरवण्यात आले. तसेच शहरांमध्ये 1 कोटी 12 लाख घरे बनवण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले. परंतु कोरोनाच्या संकटामुळे हे लक्ष देखील आता मोठे आव्हान बनले आहे.