नवी दिल्ली : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.
सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १२२ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३०,३८४ रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात १७१ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३८,०७५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.