कोरोनाचा फटका : GoAir कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

आणीबाणीच्या काळात आर्थीक मंदी देखील भासत आहे.  

Updated: Mar 25, 2020, 07:58 PM IST
कोरोनाचा फटका : GoAir कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात  title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. दिवसागणिक कोरोना रुग्ण्याच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे मृतांचा आणि रुग्णांचा आकडा लक्षात घेता एक एक करून अनेक राष्ट्रांशिवाय राज्यांमध्ये देखील सरकारने लॉकडाउन करण्याचा निरणय घेतला. अशी अणीबाणीच्या काळात आर्थिक मंदी देखील भासत आहे. अशात मोठया कंपन्यांना मोठ्या तोट्याचा सामना करावा लागत आहे. देश २४ मार्चच्या रात्रीपासून  २१ दिवसांपर्यत लॉकडाउन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी घेतला. 

अचानक घेतलेल्या या निर्णयाचा फटका आता विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या गल्ल्यावर पडताना दिसत आहे. परिणामी GoAir विमान कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. वेतन कपात करण्यासंदर्भात कंपनीने कर्मचाऱ्यांना कायदेशीर मेल देखील पाठवले आहेत. कोरोना व्हायरसमुळे कित्येक व्यवसायांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. 

लॉकडाउन घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात  कपात न करण्याचं आवाहन सर्वच कंपन्यांना केलं होतं. त्यामुळे GoAir कंपनीने घेतलेला वेतन कपातीच्या निर्णयावर चर्चा रंगत आहेत. कंपनीकडे रोख रक्कम फार कमी आहे. अशात ग्राहकांनी त्यांचे तिकीट रद्द केले आहे. त्यामुळे कंपनीला मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य GoAir कंपनीच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. 

लॉकडाउन नंतर GoAir या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  आता अनेक कंपन्या असा टोकाचा निर्णय घेतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोरोना हे सावाट कधी दूर होतं याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.