भोपाळ : मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत कोरोना बाधीत एक पत्रकार उपस्थित होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कमलनाथ यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. मध्य प्रदेशात एकूण नऊ जणांना बाधा झाली आहे. दरम्यान या पत्रकाराला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समजताच कमलनाथ यांनी स्वत:ला क्वारंटाईन करण्याचे ठरवले आहे. त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याचे आवाहन नव्या सरकारने केले आहे.
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सोपवण्यापूर्वी कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या एका पत्रकाराला कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकार परिषदेला अनेक आमदार आणि दिल्लीहून या राजकीय घडामोडीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. सरकारच्या माहिती जनसंपर्क विभागातील अनेक अधिकारीही उपस्थित होते.
या पत्रकाराची मुलगी ही अलीकडेच लंडनहून दिल्ली मार्गे आली होती. ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती आणि पत्रकार वडील एकत्र राहिले होते. तसेच त्यानंतर ते पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले होते. दरम्यान, या मुलीसोबत दिल्लीहून भोपाळला शताब्दी एक्सप्रेसने आलेल्या तिच्या भावाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. इंदूरमध्ये पाच जण बाधीत आढळल्याने तेथे संचारबंदी लादण्यात आली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे पत्रकाराच्या निमित्ताने आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या वेळी एका पत्रकारास कोविड -१९ पॉझिटिव्हची चिन्हे दिसली आहेत. २० रोजी पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावण्यासाठी गेला होता. प्रशासनाच्या सल्ल्यानुसार आरोग्य विभागाने या पत्रकाराला विलीगीकरण कक्षात ठेवले आहे. त्याचा अहवाल आज आला आहे. २० रोजी पत्रकार परिषदेत या पत्रकाराने हजेरी लावली होती. त्यामुळे त्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली असल्याने या पत्रकाराला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. हा साथीचा आजार असल्याने २० तारखेची पत्रकार परिषद कोरोना महामारीच्या सावटाखाली आली आहे.