पणजी : गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे. गोव्यात आज नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार होता. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज देखील दिल्लीत असल्यामुळे शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे. कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा अंक एकीकडे सुरु असताना गोव्यात काँग्रेसला खिंडार पडले. गोव्याचे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये दाखल झालेत. आता या बंडखोर आमदारांचा शपथविधी कधी होणार याकडे लक्ष आहे.
Goa Chief Minister’s Office: BJP National President & Home Minister Amit Shah will chair a high-level meeting on the issue of resumption of mining in Goa, tomorrow in Delhi. Goa Chief Minister Pramod Sawant will also be participating in the meeting. (File pics) pic.twitter.com/PH11UMqJjL
— ANI (@ANI) July 11, 2019
ANI Photo
दिल्लीमध्ये महत्वाच्या बैठका असल्याने मुख्यमंत्री सावंत आज रात्री किंवा उद्या गोव्यात परतणार आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळी शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसचे दहा आमदार गळाला लागल्यामुळे भाजपने महाराष्ट्र गोमंतक पक्ष (मगोप), गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात कमालीचे महत्त्व असलेल्या छोट्या पक्षांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Goa Dy Speaker Michael Lobo on state cabinet reshuffle: CM will do the correction that is needed. After merger of Congress MLAs with BJP,CM told he was unhappy with functioning of certain Ministers as they were taking people for granted. They were acting as if they were the govt. pic.twitter.com/X42w4G5hii
— ANI (@ANI) July 12, 2019
दरम्यान, गोव्यातील काँग्रेस आमदारांना पैशाचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप पक्षाचे प्रवक्ते ट्रोजिनो डिमेलो यांनी केला आहे. तसेच गुन्हे दाखल असलेले आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस पक्ष स्वच्छ झालाय, असेही ते म्हणालेत.