मोठी राजकीय बातमी । गोव्यात भाजप आणि शिवसेना नेत्याची गुप्त भेट

Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना गोव्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांची गुप्त भेट झाली आहे.

Updated: Feb 12, 2022, 01:08 PM IST
मोठी राजकीय बातमी । गोव्यात भाजप आणि शिवसेना नेत्याची गुप्त भेट title=

पणजी : Goa Assembly Election : गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना गोव्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची गुप्त भेट घेतली आहे. पणजीमधील मॅरिएंट हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे. मात्र, या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याची माहिती देण्यात आलेली नाही. (Goa Assembly Election - Secret meeting between Keshav Upadhye and Sanjay Raut)

शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्त भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चांला उधाण आले आहे. (Secret meeting between Keshav Upadhye and Sanjay Raut) गोवा विधानसभा निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या राजकिय भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोव्यात भाजपविरोधात काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी युती, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शिवसेनेचे युवा नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हेही शुक्रवारी प्रचारासाठी आले होते. संजय राऊत काही दिवसांपासून गोव्यात ठाण मांडून आहेत. त्यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झालेली आहे. असे असताना भाजप नेत्याने शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. असे असताना भाजप आणि शिवसेना नेत्यांत झालेली भेटीमुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.