MC Stan Live Show : 'बिग बॉस' ची ट्रॉफी जिंकल्यापासून रॅपल एमसी स्टॅन (MC Stan ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मिडियावर धुमाकूळ घालणारा एमसी स्टॅन रातोरात स्टार झाला. सध्या एमसी स्टॅन याच्या शो ला प्रचंड गर्दी होत आहे. चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या एमसी स्टॅनचे तितकेच विरोधकही आहेत. हैद्राबाद येथील एक लाईव्ह कॉन्सर्स्टमध्ये एमसी स्टॅनवर गर्दीतून बाटली फेकण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आता शो सुरु असतानाच MC Stan स्टेजवरुन पळून गेला आहे. इंदूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्स्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट आयोजीत करण्यात आला होता. या कॉन्सर्ट मध्ये रॅप सादर करताना कोणत्याही प्रकारची शिवराळ भाषा तसेच आक्षेपार्ह शब्द वापरु नयेते अशा सूचना करणी सेनेने दिल्या होत्या. रात्री उशीरा एमसी स्टॅन याचा लाईव्ह कॉन्सर्स्ट सुरु झाला. यावेळी त्याने करणी सेनेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत रॅप सादर केले. करणी सेनेचे कार्यकर्ते या कॉन्सर्टच्या ठिकाणी उपस्थित होते. एमसी स्टॅन स्टेजवर रॅप सादर करत असतानाच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.
लाईव्ह कॉन्सर्स्टच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एमसी स्टॅनला मारहाण करण्याची धमकी दिली. कार्यकर्त्यांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमसी स्टॅनने याने स्टवरुन पळ काढला. यामुळे लाईव्ह कॉन्सर्स्टच्या ठिकाणी पळापळ झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला. लाईव्ह कॉन्सर्स्ट सोडून एमसी स्टॅन थेट हॉटेलवर पोहचला. यानंतर करणी सेनेचे कार्यकर्ते त्याला पाठलाग करत हॉटेलपर्यंत पोहचले. यामुळे हॉटेल बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
एमसी स्टॅन एक रॅपर आणि गायक आहे. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख असे आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. त्याचे वय फक्त 23 वर्षे आहे. लहान वयातच त्याने मोठी लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावर एमसी स्टॅनचे व्हिडीओज तुफान व्हायरल होत असतात. त्याला अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्याची सगळीकडेच चलती आहे. पुर्णत: पाश्चात्त्य वेशभुषा, अंगावर अनेक ऑरनामेंट्स आणि हटके हेअरस्टाईल आणि डोळ्यावर स्टायलिश ग्लासेस यामुळे त्याची अतरंगी फॅशनही चर्चेत असते. सध्या त्याच्या गाण्यांनाही त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे.