मुंबई : आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जातोय. यंदाचा हा भारताचा 75वा स्वातंत्रदिन आहे. स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. यामध्ये सैनिक स्कूलमध्ये मुलींनाही प्रवेश देण्याचा निर्णय त्यांनी सांगितला.
भारताच्या मुली प्रत्येक क्षेत्रात आजकाल चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे देशातील सर्व सैनिक स्कूल मुलींसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "अनेक मुलींनी मला सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळावं यासाठीची विनंती केली आहे. त्यानंतर आम्ही मिझोराममध्ये प्रयोग केला होता. पण आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आता मुलीही तिथे शिक्षण घेऊ शकणार."
अमृत महोत्सव दिनाचं औचित्य साधत मोदींनी उपस्थित ऑलिम्पिक खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी त्यांनी देशवासियांना टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करण्याचं आवाहन केलं.
मोदी पुढे म्हणाले, "यशस्वी भारत हे अमृत महोत्वाचं लक्ष्य आहे. यशस्वी भारतासाठी एका नागरिकाच्या रूपात प्रत्येकाने बदलायला हवं. शतप्रतिशत हा मंत्र वापरून वाटचाल करण्याची गरज सध्या आहे. गरीब महिला मुलांमधील कुपोषण दूर कराय़चं आहे. गरिबांना आता पोषणय़ुक्त तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
संपूर्ण जगभरात इतकं कोरोनासारखं इतकं मोठं संकट असताना आपल्याला लस कशी मिळाली असती. पण आज सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरु आहे. 54 कोटींहून अधिक लोकांनी लस घेतली आहे, अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.